घरी घडलेल्या अपघाताने तमिळ अभिनेता आणि 'Krav Maga' ट्रेनर श्रीराम यांना गमवावा लागला जीव

By  
on  

तमिळ अभिनेता आणि 'Krav Maga' ट्रेनर श्रीराम यांचं निधन झालं आहे. चेन्नईमध्ये घरी झालेल्या अपघातात श्रीराम यांचं निधन झालं आहे. ते 45 वर्षांचे होते. इस्रायली सैन्याचं आत्मरक्षा तंत्र 'Krav Maga' याचं ट्रेनिंग ते देत होते. त्यांनी यापुर्वी अनुराग कश्यप आणि अमला पॉल यांनाही ट्रेनिंग दिलं आहे. घरी झालेल्या एका विचित्र अ‍पघातात त्यांना जीव गमवावा लागला आहे.

 

 

घरी पडल्यानंतर त्यांना जीवघेण्या जखमा झाल्या यामध्येच त्यांचं निधन झाल्याचं बोललं जात आहे. ते अलीकडेच 'सिल्लू करुपट्टी'  या सिनेमातून भेटीला आले होते.

Recommended

Loading...
Share