By  
on  

अमृता सुभाषला या शॉर्टफिल्मसाठी मिळाला, ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा सन्मान

नाटक, सिनेमा, वेबसिरीज, शॉर्टफिल्म या अनेक माध्यमानंतर अभिनेत्री अमृता सुभाष अलीकडेच ‘द बूथ’ या शॉर्टफिल्ममधून समोर आली होती. या शॉर्टफिल्मसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे. अमृताने नुकतीच ही बातमी सोशल मिडियाच्या माध्यमातून शेअर केली. 

 

 

अमृता आपल्या पोस्टमध्ये म्हणते, ‘माझ्या द बूथ या लघुचित्रपटासाठी मला फिल्म क्रिटीक्स गिल्ड तर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचं विशेष महत्व अशासाठी की भारतातले सर्वोत्तम समिक्षक तुमचं काम पाहून हा पुरस्कार देतात. पुढचा फोटो आहे हा पुरस्कार मला ज्या माणसामुळे मिळाला त्याचा. माझा दिग्दर्शक रोहीन रविंद्नन नायर. शाझिया या माझ्या मैत्रिण्च्या बेबाक या फिल्मने तीन पुरस्कार पटकावले. तीही पुढच्या फोटोत दिसेल. विशेष आभार रोहीनची बायको टियाचे. तिनं सुंदर स्वयंपाक करुन आम्हा सर्वांना एकत्र आणले. माझ्या या चित्रपटात पर्ण पेठेचं फार सुंदर काम आहे. या पुरस्कारात ती माझी भागिदार आहे’.  अमृता या शॉर्टफिल्ममध्ये सिक्युरिटी गार्डच्या भूमिकेत दिसली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive