By  
on  

कंगना राणावत स्टारर ‘थलैवी’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या 73 व्या जयंतीनिमित्त कंगना राणावत स्टारर ‘थलैवी’चं मोशन पोस्टर समोर आलं आहे. येत्या २३ एप्रिलला हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या टीमने मोशन पोस्टर प्रदर्शित करत रिलीज डेट जाहीर केली आहे. 

 

 

कंगनाने ट्वीटर पोस्ट करत हे मोशन पोस्टर शेअर केलं आहे. जया अम्मा यांना यांच्या जयंतीनिमित्त… जयललिता यांनी तामिळनाडूच्या राजकारणाचा इतिहास कसा बदलला हे या मोशन पोस्टर दिसत आहे. कंगनाने या सिनेमासाठी तमिळी भाषेचं प्रशिक्षणही घेतलं आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन ए.एल.विजय यांनी केलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive