By  
on  

‘एका प्रौढ व्यक्तीने केलं होतं लैंगिक शोषण’ अनुराग कश्यपची मुलगी आलियाचा खुलासा

दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या लेकीने नुकताच एक लाँजरी शूटमधील फोटो पोस्ट केला होता. यानंतर तिला ब-याच ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.  या प्रकरणाबाबत पहिल्यांदाच आलियाने तोंड उघडलं आहे. एक पोस्ट द्वारे आलियाने हा अनुभव शेअर केला आहे. ती आपल्या पोस्टमध्ये म्हणते, ‘मी बऱ्याचदा ठरवलं की अशा घटनांवर, अशा गोष्टींवर आपण बोलायला हवं. 

 

 

कारण या गोष्टी भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात रेप कल्चरला कारणीभूत ठरतायत आणि त्याला खतपाणीही घालत आहेत. लोक बलात्कार पीडितेसाठी कँडल मार्च काढतात, पण जिवंत महिलेला मात्र सुरक्षित ठेवू शकत नाहीत.’  आलियाला या फोटोनंतर अनेकदा बलात्काराच्या धमक्याही आल्या होत्या. यामुळे तिने तिचं इन्स्टाग्राम अकाउंटही डिलीट करण्याचा विचार केला होता. यासोबतच ती अल्पवयीत असताना एका प्रौढ व्यक्तीने लैंगिक शोषण केल्याचा खुलासाही केला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive