By  
on  

श्रद्धा कपूरला घरची सून बनवण्याबाबत रोहनचे वडील राकेश श्रेष्ठा म्हणतात......

गेले काही दिवस श्रद्धा कपूर आणि फोटोग्राफर रोहन श्रेष्ठा यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. पण श्रद्धा किंवा रोहन यांनी किंवा यांच्या घरच्यापैकी कुणीही या नात्याबाबत बोलताना दिसत नाहीत. याबाबत नुकतंच रोहनचे वडील यांनी या दोघांच्या नात्याबाबत विधान केलं आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणतात, “मी सांगितल्याप्रमाणे ते कॉलेजमध्ये असल्यापासून मित्र आहेत. याशिवाय जुहूमध्ये त्यांचे बरेच कॉमन मित्र आहेत.

 

ते दोघेही आपल्या व्यावसायिक आयुष्यामध्ये व्यवस्थित काम करत आहेत, म्हणून त्यांनी पुढे जाऊन जर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला तर मी नक्कीच त्याच्या विरोधात नसेन. नकार हा शब्द माझ्या डिक्शनरीमध्येच नाही. मी रोहनला ‘माझे स्वप्न’ म्हणून हाक मारतो, मी त्याला क्वचितच रोहन म्हणून हाक मारतो. त्यामुळे त्याच्या आनंदासाठी काहीही करायची माझी तयारी आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive