By  
on  

शुटिंग दरम्यान बिल्डिंगवरून पडून राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता जखमी

राष्ट्रीय पुरस्कार विजेता आणि मल्याळम अभिनेता फहद फाजिल जखमी झाला आहे. फहद ‘मल्याणकुंजु’ या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान जखमी झाला आहे. उंचावरून पडल्याने त्याला कोची येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं आहे. अ‍ॅक्शन सीन शुट करताना त्याला बिल्डिंगवरून उडी मारायची असा सीन होता. पण त्याचा बॅलन्स बिघडून तो खाली पडला.

 

त्यामुळे त्याच्या नाकाला जखम झाली आहे. सुदैवाने तो गंभीर जखमी नाही. तरीही डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. तो पुन्हा बरा होईपर्यंत सिनेमाचं शुटिंग बंद ठेवण्याचा निर्णय दिग्दर्शकाने घेतला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive