By  
on  

महिला दिनानिमित्त करिनाने समोर आणला छोट्या नवाबाचा क्युट फोटो

अभिनेत्री करिना कपूरने 21 फेब्रुवारीला ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. त्यानंतर या छोट्या नवाबाला पाहण्यासाठी सगळेजण उत्सुक आहेत. पण करिना आणि सैफने छोट्या नवाबाला इतक्यातच कॅमेरासमोर न आणण्याचा निर्णय घेतला होता. 

 

 

या दरम्यान करीनाने तिच्या दुसऱ्या बाळासोबतचा फोटो शेअर केला आहे. बाळासोबतचा एक गोड फोटो शेअर करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा फोटो ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट आहे. यात करीनाच्या खांद्यावर बाळ निवांत झोपलेलं दिसतंय. फोटोत बाळाचा चेहरा दिसत नाही. ‘असं काहीही नाही जे महिलांना करता येणं अशक्य आहे. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा’. हे कॅप्शन देत करिनाने हा फोटो शेअर केला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive