By  
on  

विराट कोहलीने लेक आणि पत्नीचा फोटो शेअर करत दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा

आज महिला दिनाचं औचित्य साधत सोशल मिडियावर शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. क्रिकेटर विराट कोहलीनेही यावेळी खास अंदाजात महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विराटने लेक वामिका आणि अनुष्काचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

 

यावेळी विराटने एक भावनिक मेसेजही पोस्ट केला आहे. यामध्ये विराट म्हणतो,  बाळ जन्म घेताना पाहणं हा अविश्वसनीय अनुभव आहे. ते पाहिल्यानंतर स्त्री किती शक्तीशाली आहे हे समजतं. परमेश्वरानं मातृत्वाचं वरदान स्त्रियांनाच का दिलं हे त्यावेळी उमगतं. माझ्या आयुष्यातील सगळ्यात उत्कट आणि दयाळू महिलेला आणि एक जी मोठी होऊन तिच्या आई सारखी होणार तिला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि जगातील सर्व आश्चर्यकारक महिलांनाही महिला दिनाच्या शुभेच्छा. अनुष्का शर्माने ११ जानेवारी रोजी मुलीला जन्म दिला होता.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive