By  
on  

महिला दिनानिमित्त सनी लिओनीने शेअर केला व्हिडियो म्हणते, ‘ बॉलिवूडमध्ये मला अश्लील कमेंट्सचाही सामना करावा लागला’

जागतिक महिला दिनानिमित्त अभिनेत्री सनी लिओनीने सोशल मिडियाच्या माध्यमातून तिचा प्रवास शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये सनी सांगते की, ती 21 वर्षांची असल्यापासून तिला तिरस्काराने भरलेली मेल्स येत आहेत. हेच नाही तर सनी हे देखील सांगते की तिला इंडस्ट्रीने दुर्लक्षित केलं होतं.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

 

यासोबतच सनी म्हणते, ‘ माझ्या डान्सला देखील नावं ठेवली गेली. मला अश्लील कमेंट्सचाही सामना करावा लागला. बॉलिवूडमधून सपोर्ट मिळाला नाही. अ‍ॅवॉर्ड शोमधून बॉयकॉटही केलं गेलं. पण मी आज माझी ड्रीम लाईफ जगत आहे.’ सनी हे देखील म्हणते, ‘तिच्याकडे आज प्रेमळ कुटुंब आहे. आणि ती एक यशस्वी बिझिनेस वुमन देखील आहे.’

Author

Recommended

PeepingMoon Exclusive