By  
on  

क्रिकेट संघ व्यवस्थापनाने दिली विरुष्कासोबतच ‘वामिका’लाही स्वत:ची नेमप्लेट

अनुष्का आणि विराट अलीकडेच आई-बाबा बनले. काही दिवसांपुर्वी या जोडीने लाडक्या लेकीचं नाव ‘वामिका’ ठेवलं असल्याचंही चाहत्यांशी शेअर केलं. विरुष्काने अजून वामिकाची थेट झलक चाहत्यांसमोर आणली नसली तरी तिला पाहण्यासाठी सगळेचजण उत्सुक आहेत. 

वामिका सध्या आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी सगळी टीम अहमदाबद येथील हयात हॉटेलमध्ये थांबली आहे. यावेळी या रुम्सना घरचा टच देण्यासाठी प्रत्येकाच्या खोलीला नेमप्लेट देण्यात आली आहे. यात विराट कोहलीच्या खोलीबाहेर विराट, अनुष्का आणि मुलगी वामिकाचं नाव देण्यात आलं आहे

Author

Recommended

PeepingMoon Exclusive