By  
on  

अंकिता लोखंडेलाही मिळाली होती ‘तसली’ ऑफर, शेअर केला कास्टींग काऊचचा अनुभव

पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेली मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे सर्वांनाच माहिती आहे. अंकिताने मणिकर्णिका सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण अंकिताच्या या प्रवासात तिला एकदा नव्हे तर दोन वेळा कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. एका मुलाखती दरम्यान तिने ही बाब शेअर केली आहे.

 

 

ती म्हणते, ‘एका दक्षिणात्य सिनेमाच्या ऑडिशनसाठी मला बोलावण्यात आलं होतं. तिथे एका खोलीत मला बोलवलं ‘तुला कॉम्प्रमाइज कराव लागेल, तयारी आहे ना’, असं विचारलं. मी त्यावेळी १९-२० वर्षांची होते. मी त्या व्यक्तिला हिम्मतीने विचारलं,. कोणत्या प्रकारचं कॉम्प्रोमाइज तुमच्या निर्मात्याला पाहिजे आहे? मला पार्टी किंवा डिनरसाठी जावं लागेल का?’ हे ऐकून त्याने निर्मात्याने शारिरीक संबंधाची मागणी केली असल्याचं समोर आलं.

 

 

यानंतर सिनेमा पदार्पणातील एका पार्टीदरम्यान मला नावं सांगायचं नाही, तो एक खूप मोठा अभिनेता होता. मला त्याच्या भावना समजल्या आणि मी लगेचचं हात मागे घेतला. मला माहित होतं आता इथे माझं काम होणार नाही. कारण इथे वेगळाच व्यवहार चालत असल्याचं समोर आलं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive