By  
on  

मिलिंद सोमणसोबत सेल्फी पाहिजे? करावं लागेल हे काम

शुटींगच्या व्यस्त शेड्युलमधुन वेळ काढत फिटनेसबाबतीत जागरुक असणा-या कलाकारांमध्ये अभिनेता मिलिंद सोमणकडे पाहीले जाते. मॉडेलिंगच्या विश्वात मिलिंदने स्वत:चं असं खास स्थान निर्माण केलं आहे. फिटनेस फ्रिक आणि आयर्न मॅन  अशी ओळख मिलिंद वेळोवेळी सार्थ ठरवत असतो. 

 

 

मिलिंदसोबत फोटो काढण्यासाठी चाहते पुढे येत असतात. पण त्याच्यासोबत सेल्फी काढायचा असेल तर एक अट पाळावी लागते. ‘Pushups for selfie!’ हे कॅप्शन देत त्याने फोटो शेअर केला आहे. यामध्ये मिलिंद म्हणतो, ‘सेल्फी काढायचा असेल तर पुशअप्स मारावे लागतील. २० पुशअप्स मुलांसाठी आणि १० पुशअप्स मुलीसांठी. कारण माझी आई वयाच्या ८२व्या वर्षी २० पुशअप्स मारते. जवळपास ९०% लोक हे करण्यास तयार झाले. काहींनी ते पहिल्यांदा केले तर काहींनी विमानतळ, हॉटेल, महामार्गावर देखील केले. जी गोष्टी तुमच्या चांगल्यासाठी असते ती करायला कधी नाही म्हणू नका. कोणतंही कारण देऊन ती गोष्ट टाळू नका. जर तुम्ही प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला चांगले वाटेल’. मिलिंद अलीकडेच ‘पौरुषपूर’ या सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive