By  
on  

इंडियन आयडॉल 12च्या सेटवर नीतू कपूर यांनी केला या गाण्यावर परफॉर्म

इंडियन आयडॉल 12च्या सेटवर यावेळी नीतू कपूर यांनी हजेरी लावली आहे. ऋषी यांच्या निधनानंतर नीतू यांनी पहिल्यांदाच कोणत्यातरी मंचावर हजेरी लावली आहे. इंडियन आयडॉल 12चा हा एपिसोड ऋषी आणि नीतू यांच्यावर बेतला आहे.  या शोचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. यावेळी नीतू एका स्पर्धकासोबत एक मैं और एक तू' गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.

 

 

यादरम्यान रिद्धीमा आणि रणबीर यांनी एक व्हिडियो शेअर करत नीतू यांच्यासाठी खास मेसेज दिला आहे. रणबीर आणि रिद्धीमाला स्क्रीनवर पाहताच नीतू यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. यासोबतच त्यांनी नेहाला ‘शगुन’ ही दिला.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive