By  
on  

वैभव तत्ववादी आता झळकणार अ‍ॅक्शनपॅक्ड सिरीजमध्ये

मराठी आणि बॉलिवूड सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना दखल घेण्यास भाग पाडणारा अभिनेता म्हणजे वैभव तत्ववादी. वैभव अलीकडेच  ‘त्रिभंगा’ या सिनेमात झळकला होता. वैभवने आतापर्यंत मराठीसोबत 'हंटर', 'बाजीराव मस्तानी', 'मणिकर्णिका' यांसारख्या हिंदी सिनेमांमध्ये स्वतःच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.  

 

 

आता तो सोनीलिव्हच्या आगामी 'प्रोजेक्ट ९१९१'मध्ये दिसणार आहे. या सिरीजमध्ये तो पंकज नावाच्या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिरीजमध्ये वैभवसोबत तृष्णा मुखर्जी, अभिषेक खान, मानिनी डे, जगत रावत, शरद कुमार यांच्याही भूमिका आहेत.

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive