By  
on  

लस घेऊनही अभिनेता परेश रावल यांना करोनाचा संसर्ग

करोनाच्या दुस-या लाटेच्या बाबत सर्वत्र ऐकायला मिळत आहे. अनेक सेलिब्रिटीही यामध्ये करोनाच्या संसर्गाने प्रभावित होताना दिसत आहेत. दिग्गज अभिनेता परेश रावल यांनाही करोनाचा संसर्ग झाला आहे. विशेष म्हणजे परेश यांनी या 9 मार्चलाच करोनाची लस घेतली होती. परेश यांनी ट्वीट करत करोनाचा संसर्ग झाल्याचं शेअर केलं आहे.

 

 

दुर्दैवाने माझा कोव्हि़ड 19 चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या दहा दिवसात जे कुणी माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी कृपया करोना टेस्ट करावी.’ हे ट्वीट करत त्यांनी  करोना झाल्याची माहिती दिली. तुफान’ या सिनेमातून परेश रावल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive