By  
on  

बॉयफ्रेंड विकी कौशलनंतर कतरिना कैफलाही झाला करोनाचा संसर्ग

रयुमर्ड बॉयफ्रेंड विकी कौशलचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर अभिनेत्री कतरिना कैफनेही तिच्या करोना पॉझिटिव्ह असल्याची पोस्ट शेअर केली आहे. माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाइन आहे. मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे.

 

गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया करोना चाचणी करुन घ्या’ अशा आशयाची पोस्ट शेअर करत तिने पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे.  नुकतीच अभिनेता विकी कौशलची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. करोनाच्या या दुस-या लाटेचा फटका अनेक सेलिब्रिटींना बसला आहे. अक्षय कुमार, भूमी पेडणेकर, मनोज वाजपेयी या यादीत आता विकी आणि कतरिना यांचीही नावं समाविष्ट झाली आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive