By  
on  

घराबाहेर न जाताही मला करोना कसा होऊ शकतो? राहुल रॉय यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून उपस्थित केला प्रश्न

करोनाची भीषणता आता प्रत्येकालाच घाबरवून सोडते आहे. करोनाच्या या दुस-या लाटेने रौद्ररुप धारण केलं आहे. अनेक कलाकारही या करोनाच्या विळख्यात येताना दिसत आहेत. बिग बॉस फेम अभिनेता राहुल रॉयला करोनाची लागण झाली आहे. फक्त राहुलला नाही तर त्याची बहिण आणि मेहुण्याला पण करोनाची लागण झाली आहे. राहुल यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून ही बाब शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये राहुल म्हणतात, ‘ माझ्या फ्लोअरवर करोना रुग्ण सापडल्याने २७ मार्च रोजी माझा फ्लोअर सील करण्यात आला. गेल्या १४ दिवसांपासून आम्ही होम क्वारंटाइन आहोत.

 

 

मला आणि माझ्या कुटूंबाला ११ एप्रिल रोजी दिल्लीला जायचं होतं, त्यासाठी आम्ही ७ एप्रिल रोजी मेट्रोपोलिस लॅबमधून आरटीपीसीआर चाचणी केली. तर १० एप्रिल रोजी माझ्या संपूर्ण कुटुंबाला करोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं. 
आम्हाला कोणालाही कोणतीच लक्षणं नव्हती. यानंतर मी अ‍ॅंटीजेन टेस्ट केली तर ती निगेटिव्ह आली. BMC अधिकाऱ्यांनी मला आणि माझ्या कुटुंबियांना आयसोलेशन फॉर्मवर सही करण्यास भाग पाडलं, माझे घर सॅनिटाइज केलं. डॉक्टर काहीही प्रश्न विचारत होते, आमचा कौटुंबिक व्यवसाय काय आहे?  मला रुग्णालयात क्वारंटाइन होण्याचा सल्ला दिला, तर मी म्हणालो आम्हाला कोणतीही लक्षण नाहीत. तर त्यांनी आम्हाला ऑक्सिजन लेव्हलचा चार्ट बनवायला सांगितला आणि काही औषध घेण्यास सांगितलं. “मला माहित आहे की करोना अजून आहे. परंतु मी आणि माझ्या कुटुंबीयांना घरातून बाहेर निघाल्या शिवाय, कोणाला न भेटता करोनाची लागण कशी झाली? मला याचं उत्तर कधी मिळणार नाही.  माझी बहिण प्रियांका ही एक योगिनी आहे. तिने श्वास घेण्याच्या जुन्या पद्धतींचा अभ्यास केला आहे. ती तर गेल्या ३ महिन्यांपासून घरातून बाहेर पडलेली नाही, तर तिचा अहवाल हा करोना पॉझिटिव्ह कसा आला? हा प्रश्नही राहुल यांनी उपस्थित केला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive