By  
on  

रामायणाच्या पुन: प्रसारणाबाबत ऑनस्क्रीन सीता दीपिका चिखलिया यांनी व्यक्त केला आनंद

रामायण ही ९० च्या दशकांतील गाजलेली पौराणिक मालिका लॉकडाऊनमुळे पुन्हा  एकदा दूरदर्शनवरुन रसिकांच्या भेटीला आली आणि लोकप्रियतेचे सारे उच्चांक तिने मोडले.  आताही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. या मालिकेत सीतेच्या भूमिकेत दिसत असलेल्या दीपिका चिखलिया यांनी ही बातमी सोशल मिडियावर शेअर केली आहे.

 

 

‘सांगण्यास आनंद होत आहे की रामायण पुन्हा छोट्या पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्येही रामायण ही मालिका दाखवण्यात आली होती. असं वाटतंय इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. ही मालिका फक्त माझ्याच नाही तर हजारो परिवारांच्या आयुष्याचा फार मोठा भाग आहे. या आमच्यासोबत आणि आपल्या पुढच्या पिढ्यांनाही रामायणाबद्दलची माहिती द्या’. स्टार भारत या चॅनेलवर दररोज संध्याकाळी ७ वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive