By  
on  

सलमान शाहरुखच्या ‘पठान’मधील कॅमिओसाठी घेणार नाही फी ?

मोठ्या ब्रेकनंतर शाहरुख ‘पठान’मधून वापसी करत आहे. या महिन्यापासून शाहरुख शुटिंगला सुरुवात करत असल्याचं समजत आहे. या सिनेमात जॉन आणि दीपिकाही दिसणार असल्याची चर्चा आहे. यशराज या सिनेमाची निर्मिती करत आहे. सलमानने त्याच्या कॅमियोसाठी फेब्रुवारीमध्ये शुटिंग पुर्ण केलं.

 

यावेळी आदित्य चोप्राने त्याला फीबाबत विचारलं, त्यावेळी सलमान म्हणला की शाहरुख माझ्या भावासारखा आहे. त्यामुळे मी त्याच्यासाठी काहीही करु शकतो. आदित्यने विचारुनही सलमानने फी घेण्यास नकार दिला. यावेळी आदित्यने सिनेमा रिलीज करताना सलमानला खास भेट द्यायचं नक्की केल्याचं समजतं.  यापुर्वी सलमानने शाहरुखच्या ‘झिरो’ आणि ‘ओम शांती ओम’ मध्ये कॅमिओ केला होता. पठानमध्ये शाहरुख आणि जॉन एकमेकांविरोधात उभे ठाकताना दिसणार आहेत

Author

Recommended

PeepingMoon Exclusive