By  
on  

प्राची देसाई म्हणते, ‘ मोठ्या सिनेमासाठी मलाही कॉम्प्रमाईज करण्यासाठी सांगितलं गेलं’

अभिनेत्रींना येणारा कास्टिंग काऊचचा अनुभव बॉलिवूडसाठी नवा नाही. आता अभिनेत्री प्राची देसाईनेही तिचा कास्टिंग काऊचचा किस्सा शेअर केला आहे. प्राची म्हणते, ‘कास्टिंग काऊचसारख्या घृणास्पद प्रकाराला मलाही सामोरं जावं लागलं. मी नकार देऊनही दिग्दर्शकाने मला कॉम्प्रमाईज करण्यास सांगितलं.

 

हा सिनेमा खुप मोठा होता. पण मी कॉम्प्रमाईज करावं अशी दिग्दर्शकाची इच्छा होती. मी नकार देऊनही मला सतत फोन केला गेला. त्यावेळी मी स्पष्टपणे हा सिनेमा करणार नाही असं सांगितलं. प्राचीने 2006 मध्ये ‘कसम से’ सिरिअल पासून करिअरची सुरुवात केली. तर रॉक ऑन या सिनेमातून तिने बॉलिवूड डेब्यु केला. याशिवाय प्राची बोल बच्चन, वन अपॉन अ टाइम इन मुंबई' आणि अजहर या सिनेमातही दिसली होती.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive