By  
on  

अजय देवगणने डिजिटल डेब्यु 'Rudra - The Edge Of Darkness' ची केली घोषणा

यावर्षी अभिनेता अजय देवगणने सिनेसृष्टीमध्ये 30 वर्षं पुर्ण केली. यानिमित्ताने अजय नुकतीच त्याच्या डिजीटल डेब्युची घोषणा केली आहे. अजयने त्याचा पहिला वेब शो ‘रुद्र: द एज ऑफ डार्कनेस’ ची घोषणा केली आहे. अजयने सोशल मिडियावर रुद्रचं मोशन पोस्टर शेअर केलं आहे. यात अजय काळ्या ड्रेसमध्ये दिसते आहे. ‘या वर्षी हॉटस्टार स्पेशल 'रुद्र - द एज ऑफ डार्कनेस' ‘ ची घोषणा करताना आनंद होतो आहे. हे सगळ्यांवर भारी आहे.’ 

 

 

हा शो ब्रिटीश सायकोलॉजिकल ड्रामा ‘लुथर’चं ऑफिशिअल अ‍ॅडॉप्शन आहे. या शोचं दिग्दर्शन राजेश मापुस्कर करत आहेत. एपलॉस एंटरटेनमेंटद्वारा या सिनेमाची निर्मिती केली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive