By  
on  

नितीन देसाईंच्या ND स्टुडियोला आग, ‘जोधा अकबर’चा सेट भस्मसात

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाईंच्या ND स्टुडियोला आग लागली आहे. या भीषण आगीत जोधा अकबर’ सिनेमातील किल्ल्याचा सेट आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचं समोर आलं नाही. 
कर्जत रोडवर नितीन यांचा स्टुडियो आहे. 

स्टुडियोच्या पाठीमागे असलेल्या सुकलेल्या गवतामुळे आग लागल्याचं समजत आहे. ही आग कमी वेळात पसरत जाऊन  जोधा अकबर सिनेमासाठी बनवलेल्या किल्ल्याच्या सेटपर्यंत आग पोहोचली. आणि त्यात सेटच्या काही भागाला आग लागली. ही आग विझवली गेली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive