By  
on  

करोना विरोधातील लढ्यात आता विराट-अनुष्काचाही मदतीचा हात

अभिनेत्री अनुष्का शर्मा पती विराट कोहलीसह करोना विरोधात लढा देण्यास सज्ज झाली आहे. या दोघांनीही करोना लढ्यासाठी 2 कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे. या लढ्यात 7 कोटींची मदत उभा करण्याची इच्छा असल्याचही त्यांनी सांगितलं. या दोघांनी व्हिडियो शेअर केला आहे. #InThisTogether असं या जोडीच्या अभियानाचं नाव आहे.

 

 

आपल्या व्हिडियोमध्ये ते म्हणतात, करोनाच्या दुसऱ्या लाटेशी आपला देश लढा देत आहे. आपल्या आरोग्य यंत्रणेला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. आपल्या लोकांच्या समस्या पाहून मला दु:ख झाले. त्यामुळे गरजूंना मदत करण्यासाठी मी आणि विराटने #InThisTogether ही मोहिम सुरु केली आहे’.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive