By  
on  

चिमुकल्या समीषासह शिल्पा शेट्टीचं कुटुंब करोनाच्या जाळ्यात

देशभरात करोनाने आपलं जाळं विणलं आहे. अनेकांनी या लढाईत प्राण गमावले आहेत. करोनाने अनेक गुणवंत कलाकरांना आपल्यातून हिरावून नेलं आहे. अनेक सेलिब्रिटी करोनाशी झगडत आहेत. सुपरफिट अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या संपूर्ण कुटुंबाला करोना झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. शिल्पाने पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये ती म्हणते, ‘ ‘मागील १० दिवस आमच्या कुटुंबासाठी अत्यंत कठीण होते. माझ्या सासु-सासऱ्यांची करोनो चाचणी पॉझिटिव्ह आली. 

 

 

त्यानंतर समिषा, विहान, माझी आई आणि आता राज यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. हे सगळे आयसोलेशनमध्ये आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहेत. आमच्या घरातील दोन कर्मचारी देखील करोना पॉझिटिव्ह आहेत. त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत.’ यानंतर तिने तिची टेस्ट निगेटिव्ह आल्याबाबतही शेअर केलं आहे. यासोबतच चाहत्यांना कुटुंबासाठी प्रार्थना करण्यासाठीही आवाहन केलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive