By  
on  

संजय लीला भन्साळींच्या ‘हीरा मंडी’ मध्ये दिसणार माधुरी दीक्षित?

पीपिंगमूनने तुम्हाला यापुर्वीच सांगितलं होतं की संजय लीला भन्साळी हीरा मंडी या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टची नेटफ्लिक्ससाठी निर्मिती करत आहेत. गेली 13 वर्षं या प्रोजेक्टबाबतच्या चर्चा सुरु आहेत. एका लिडींग डेलीनुसार हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा यांची नावं सिनेमासाठी फायनल झाली आहेत.

 

 

आता सौंदर्यवती माधुरी या सिनेमात डान्स नंबर करणार असल्याचं समोर येत आहे. इतर भन्साळीपटांप्रमाणेच हा सिनेमाही भव्य असणार आहे. या सिनेमातील एका स्पेशल गाण्यात माधुरी मुजरा करताना दिसेल.  माधुरीनेही ही ऑफर स्विकार केल्याचं समोर येत आहे. आठ –दहा दिवसांच्या शेड्युलमध्ये हे गाणं शुट केलं जाईल. माधुरीला पुन्हा एकदा नृत्य अदाकारी साकारताना पाहणं चाहत्यांसाठी पर्वणी असेल यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive