By  
on  

प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालच्या घरी चिमुकल्याचं आगमन

प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालच्या घरी गोड बातमी असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं होतंच. श्रेयाने बेबी बम्प फ्लाँट करत चाहत्यांशी ही गोड बातमी शेअर केली होती. पण आता श्रेयाच्या आनंदात आणखी भर पडली आहे. श्रेयाच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. काल दुपारी श्रेयाने मुलाला जन्म दिला आहे.

 

 

श्रेयाने पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. आज दुपारी ईश्वराने आशिर्वादाच्या रुपात आम्हाला मौल्यवान मुलगा दिला आहे. अशा प्रकारची भावना या आधी कधीच अनुभवली नव्हती. शिलादित्य, मी आणि आमचं कुटुंब आनंदात आहोत. तुम्हा सर्वांच्या आशिर्वादासाठी धन्यवाद.’  श्रेयाच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि इतर सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. श्रेयाने यापुर्वी बाळाचं नावही रिव्हील केलं होतं. बाळाचं नाव श्रेयादित्य असल्याचं तिन शेअर केलं होतं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive