By  
on  

....................म्हणून कमल हसन आणि सारिकाच्या घटस्फोटाचा श्रुती हासनला झाला होता आनंद

श्रुती हासन हे दाक्षिणात्य सिनेमातील प्रसिद्ध नाव आहे. आई-वडिल दोघांकडून श्रुतीला अभिनयाचा वारसा मिळाला आहे. श्रुतीच्या जन्मानंतर कमल हसन आणि सारिकाने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. श्रुतीने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे. त्यात ती म्हणते 'मी आई-वडिलांच्या वेगळं होण्याच्यानिर्णयामुळे उत्साही होते. कारण ते आता आयुष्य आपापल्या पद्धतीने जगू शकत होते.

 

मला आनंद आहे की, ते दोघं वेगळे झाले आहेत' असे श्रुती म्हणाली. पुढे ती म्हणते, ‘घटस्फोट झाल्यानंतरही ते दोघं एक चांगले पालक म्हणून वागत आहेत. मी माझ्या वडिलांच्या अतिशय जवळ आहे. माझी आई देखील चांगली वागत आहे आणि ती आमच्या आयुष्याचा एक भाग आहे. ते वेगळे झाल्यावर आनंदित आहेत.’ श्रुती यापुर्वी वेलकम बॅक, शमिताभ, दिल तो बच्चा है जी’ मध्ये दिसली होती.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive