By  
on  

‘हे सर्वात अमानुष आणि घृणास्पद आहे’ रामदेव बाबांच्या विधानानंतर उर्मिला मातोंडकर कडाडली

करोना काळात बाबा रामदेव यांनी अनेक उत्पादन करोनाविरोधी असल्याचा दावा केला होता. पण सध्या एका विधानामुळे रामदेवबाबा चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्या या विधानामुळे अनेकांनी त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. आता अभिनेत्रे उर्मिला मातोडकरनेही रामदेवबाबांच्या विधानाचा खरपुस समाचार घेतला आहे.

 

 

ती आपल्या ट्वीटमध्ये म्हणते, ‘कोणीतरी या बिझनेसमनला एखाद्या कोविड रुग्णालयात जायला सांगा. तिथे आपल्या डॉक्टर, फ्रंटलाइन वर्कर्ससोबत २४ तास घालवा आणि मग ही टरटर करा. हे सर्वात अमानुष, संतापजनक आणि तिरस्करणीय आहे. हे कुणाचे टूलकिट आहेत? त्यांची इतकी हिंम्मत होतेच कशी? 

रामदेव बाबा यांनी अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान असून रेमडेसिविर, फॅव्हिफ्लू यांसह औषध महानियंत्रकांनी मान्यता दिलेली अनेक औषधं करोनावर उपचार करण्यात अपयशी ठरली आहेत. अशा आशयाचं विधान केलं होतं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive