By  
on  

मिलिंद सोमणसोबतच्या सेल्फीसाठी महिलेचे भर बाजारात पुश अप्स, पाहा व्हिडियो

अभिनेता- मॉडेल  आणि  फिटनेस प्रोमोटर मिलिंद सोमण हा नेहमीच चर्चेत असतो. मिलिंदच्या फिटनेसचे असंख्य फॅन आहेत. वयाच्या 55 व्या वर्षीही कोणत्या तरुणापेक्षा जास्त फिट असलेल्या या अभिनेत्याचे चाहते बरेच आहेत. मिलिंदसोबत फोटो काढण्यासाठी चाहते पुढे येत असतात. पण त्याच्यासोबत सेल्फी काढायचा असेल तर एक अट पाळावी लागते. ‘Pushups for selfie!’ हे कॅप्शन देत त्याने फोटो शेअर केला आहे.

 

 

यामध्ये मिलिंद म्हणतो, ‘सेल्फी काढायचा असेल तर पुशअप्स मारावे लागतील. २० पुशअप्स मुलांसाठी आणि १० पुशअप्स मुलीसांठी. मिलिंदने नुकताच एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये एक मध्यमवयीन बाई चक्क रस्त्यावर पुश अप्स करताना दिसते आहे. तिचे पुश अप्स होताच मिलिंदने या फोटो काढू असं आमंत्रणही दिलं आहे. या व्हिडियोच्या कमेंटमध्ये नेटिझन्स महिलेचं कौतुक करत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive