By  
on  

सुशांत सिंग राजपुतच्या पुण्यतिथीच्या काहीच दिवस आधी NCB ने केली त्याच्या खास मित्राला अटक

ड्रग्ज प्रकरणात सुशांत सिंग राजपुतचा मित्र सिद्धार्थ पिठानीला नार्कोटिक्स ब्युरोने अटक केली आहे. त्याला हैद्राबादमधून ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला मुंबईला आणलं जाईल. त्यानंतर पुन्हा त्याची चौकशी केली जाईल. सीबीआयने यापुर्वीही त्याची चौकशी केली आहे. सिद्धार्थ सुशांतचा रुममेट होता. सुशांतचा मृतदेह सर्वात पहिल्यांदा सिद्धार्थने पाहिला होता. पोलिस आणि रुग्णवाहिकेला बोलावलं. मागील आठवड्यातच सिद्धार्थचा साखरपुडा झाला आहे. 

 

सर्वात प्रथम सिद्धार्थने पाहिलं. त्यावेळी सुशांतच्या घरी सिद्धार्थ पिठानी, दीपेश सावंत, नीरज सिंह , केशव हे लोक उपस्थित होते. 10वाजता सुशांतच्या बेडरुमचा दरवाजा उघडला गेला नाही. त्यानंतर सिद्धार्थला काही संशय आला. त्याने सुशांतची बहीण मीतूला बोलावून घेऊन दरवाजा उघडला. त्यावेळी सुशांतला पंख्याला लटकलेलं पाहिलं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive