By  
on  

…….. यासाठी छोटी भूमिका असूनही प्रवीण तरडे यांनी स्विकारला ‘राधे’

मराठमोळे अभिनेते प्रवीण तरडे सलमानच्या आगामी ‘राधे’ सिनेमात झळकणार असल्याचं पीपिंगमून मराठीने सर्वात आधी सांगितलं होतं. या सिनेमात प्रविण तरडेंनी दगडू दादा ही एका गुंडाची भूमिका साकारली होती. मात्र ही भूमिका अत्यंत छोटी होती. यामुळे प्रवीण यांचे चहाते नाराज झाल्याचं समोर येत होतं. स्वत: प्रवीणनेही यावर भाष्य केलं आहे.

 

 

प्रवीण म्हणतात, ‘राधेमध्ये भूमिका किती मोठी आहे हे माझ्यासाठी महत्वाचं नाही. मला सलमानसोबत नातं निर्माण करायचं  होतं. हा अनुभव खूपच चांगला होता.” असं ते म्हणाले. प्रवीण तरडे आगामी सरसेनापाती हंबीरराव या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive