By  
on  

सुशांत सिंग राजपुतच्या पहिल्या पुण्यतिथी दिवशी रिया चक्रवर्तीची पोस्ट चर्चेत

अभिनेता सुशांत सिंग राजपुतचा आज पहिला स्मृतीदिन. सुशांत सिंह राजपूत या बॉलिवूडच्या हरहुन्नरी अभिनेत्याने 14 जून रोजी वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी गळफास लावून आत्महत्या करणं सर्वांच्याच जिव्हारी लागलं. सुशांतच्या जाण्यानंतर आठवणींच्या माध्यमातून तो आपल्यात आहे.

 

 

आज त्याच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त चाहते, कुटुंबिय, त्याच्या आठवणींना उजाळा देत आहेत. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीनेही खास पोस्ट करत भावनांना वाट करुन दिली आहे. ती म्हणते,  'तू आज नाहीस या गोष्टीवर माझा अजूनही विश्वास बसत नाही. मला प्रत्येक क्षणी मला असे वाटते तू आहेस... कुठे तरी आहेस... असे म्हणतात काळ हे उत्तम औषध असते. परंतु माझ्यासाठी तूच काळ होतास आणि माझे सर्वस्व देखील तूच होतास. मला माहिती आहेस तू माझ्यासाठी आता देवदूताची भूमिका करत आहेस. तुझ्या दुर्बिणीतून चंद्रावरून तू माझ्याकडे बघत आहेस आणि माझे रक्षणही करत आहेस. मी रोज त्या दिवसाची वाट बघते आहे, ज्या दिवशी तू येथील आणि मला तुझ्यासोबत घेऊन जाशील. खरे तर मला माहिती आहे की तू माझ्यासोबतच आहेस... तरी देखील मी तुला सतत शोधत असते...तू मिळाला नाहीस की उदास होते. मग मी विचार करते तू यावर म्हणशील, 'मी तर तुझ्याजवळच आहे बेबू...' पण मी पुन्हा दुस-या दिवशी पुन्हा तुला शोधत रहाते...'

रियाने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, ' जेव्हा जेव्हा मला वाटते ती तू इथे नाहीस, तेव्हा माझ्या मनामध्ये भावनांचा सागर दाटून येतो. हे लिहितानाही माझ्या मनाला खूप यातना होतात, मला आता तर कोणत्या गोष्टींमुळे फक्त दुःखाचीच जाणीव होते... तुझ्याशिवाय आयु्ष्य नाहीच आणि माझ्या आयुष्याचे सारे अर्थ तू जाताना तुझ्यासोबत घेऊन गेलास. माझ्या आयुष्यात जे रितेपण आले आहे, ते कशानेही भरले जाऊ शकत नाही. तुझ्याशिवाय मी अजूनही उभी आहे... माझ्या सदैव तळपणा-या प्रिया, मी तुला रोज 'मालपुओ' देईन आणि संपूर्ण जगामधील भौतिकशास्त्राची तमाम पुस्तके वाचण्याचे वचन देते. पण प्लीज तू परत ये ना... मला तुझी खूप आठवण येते... माझा सर्वोत्तम मित्र, माझा प्रियकर, माझे प्रेम... बेबू आणि पुटपुट कायमच....'

Author

Recommended

PeepingMoon Exclusive