मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर फरहान अख्तरची भावूक पोस्ट

By  
on  

भारताचे महान माजी धावपटू आणि ‘फ्लाईंग सिख’ म्हणून प्रसिध्द असलेले मिल्खा सिंग यांचे निधन झाले आहे. ते 91 वर्षांचे होते. मोहालीतील एका रुग्णालयात मिल्खा सिंग यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना करोनाची लागण झाली होती.परंतु त्यानंतर रिपोर्ट निगेटिव्ह येऊनसुध्दा त्यांना ताप व ऑक्सीजन पातळीमध्ये घट झाल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. मिल्खा सिंग यांच्या निधनाच्या बातमीने अवघा देश शोकसागरात बुडाला आहे. 

बॉलिवूडचा प्रसिध्द अभिनेता फरहान अख्तर याने देखील एक पोस्ट शेअर करत मिल्खा सिंग यांच्या निधनाचं दु:ख व्यक्त केलंय. फरहानने मिल्खा सिंग यांचा जीवनपट  ‘भाग मिल्खा भाग’ या सिनेमात मिल्खा सिंग यांची व्यक्तीरेखा साकारली होती. हा सिनेमा प्रचंड लोकप्रिय ठरला होता. प्रेक्षकांसह समिक्षकांनीसुध्दा या सिनेमाचं भरभरुन कौतुक  केलं होतं. 

 

 

भावूक होत फरहान म्हणतो, ” प्रिय मिल्खाजी, तुम्ही या जगात नाहीत हे स्विकारण्यासाठी अद्यापही माझं मन तयार नाही. कदाचित तुमच्याकडून मला मिळालेली ही ती एक जिद्द न सोडण्याची बाजू म्हणता येईल. कधीही हार न मानण्याची बाजू…आणि सत्य हे आहे की तुम्ही आमच्यात कायम जीवंत राहाल. कारण तुम्ही खूप प्रेमळ, मोठ्या मनाचे आणि दयाळू व्यक्ती होता.तुम्ही तुमच्या कल्पना, तुमचं स्वप्न साकारलं. मेहनत, प्रामिणिकपणा आणि जिद्दीच्या जोरावर आकाशाला स्पर्श करणंही शक्य असल्याचं तुम्ही दाखवून दिलं.” 

Recommended

Loading...
Share