By  
on  

सायराबानो यांनी दिली दिलीप कुमार यांची हेल्थ अपडेट, आता अशी आहे प्रकृती

दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं आहे.  30 जून रोजी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. काल सायराबानो यांनी दिलेल्या अपडेटमध्ये दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर आहे. पण अद्याप ते आयसीयूतच आहेत. हे सांगितलं होतं.

 

 

दिलीप कुमार यांच्यावर जलील पारकर आणि नितीन गोखले हे उपचार करत आहेत. त्यांनी सांगितलं की दिलीप यांना सोमवारी आयसीयुमधून बाहेर काढलं जाईल. मंगळवारी श्वसनास त्रास होऊ लागल्याने दिलीप यांना हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केलं. या कुटुंबाचे जवळचे मित्र फैजल फारुखी यांनी यापुर्वी दिलीप यांच्या आरोग्याबाबतचं स्टेटमेंट दिलं होतं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive