By  
on  

या समस्येमुळे अभिनेता शरद केळकरला मिळालं होतं रिजेक्शन, वाचा सविस्तर

लक्ष्मीबाँब, तानाजी: द अनसंग वॉरिअर सिनेमातील छत्रपती शिवाजी महाराजांची दमदार भूमिका साकारून शरद केळकरने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. शरद एक उतम अभिनेता आहेच. पण एक व्हॉईस ओव्हर आर्टिस्टही आहे.  
पण तुम्हाला माहिती आहे का? अडखळत बोलण्याच्या सवयीमुळे शरद केळकरला अनेकदा नकार पचवावे लागले.

 

 

'द न्यू इंडियन एक्सप्रेस' शी बोलताना शरदने याचा खुलासा केला. शरद म्हणतो, ‘ मी लहान असताना अडखळत बोलण्याच्या सवयीमुळे मला वाईट पद्धतीने वागवलं जायचं. पण आता मी अशा प्रोफेशनमध्ये आहे जिथे स्पीच स्कील मोठ्याप्रमाणावर वापरलं जातं. अनेकदा रिजेक्शन मिळाल्याने मी अभिनय क्षेत्रापासूनही दुर होण्याचं ठरवलं होतं. पण याच नकारामुळे मला पुन्हा उठून उभं राहण्याची प्रेरणा मिळाली. दोन वर्षं या समस्येवर काम केलं त्यानंतर मी अजिबात मागे वळून पाहिलं नाही.’ शरद नुकताच फॅमिली मॅन 2 मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive