By  
on  

आजारपणामुळे या अभिनेत्रीला भेडसावत आहे आर्थिक संकट

अनेक मालिका आणि सिनेमांमधून झळकलेल्या अभिनेत्री शगुफ्ता अली सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. शगुफ्ता यांनी नुकतीच ही बाब शेअर केली. शगुफ्ता यांनी नुकतीच ‘स्पॉटबॉय’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत शगुफ्ता यांनी त्यांच्या आर्थिक संकटासोबत त्यांच्या आजरपणा बद्दल सांगितले आहे.

 

 

शगुफ्ता या आजारपणाबाबत सांगताना म्हणतात, ‘मी गेल्या २० वर्षांपासून कर्करोगाशी सामना करत आहे. पण त्यावेळी हे सगळं मॅनेज करु शकत होते. मला तिसऱ्या स्टेजचा कर्करोग झाला होता. मी त्याच्याशीलढा दिला आणि. पहिल्यांदाच मी याबद्दल शेअर करते आहे. शस्त्रक्रियेनंतरही मी अनेकदा कामावरती जातच राहिले.  याशिवाय मला अनेकदा अपघातांनाही सामोरं जावं लागलं आहे.’ शगुफ्ता यांनी आजवर १५ सिनेमे  आणि २० मालिकांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री शिल्पा तुळसकर यांनीही सोशल मिडियाच्या माध्यमातून शगुफ्ता यांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive