पोर्नोग्राफी प्रकरणात अटक झालेल्या राज कुंद्रा यांची भायखळा जेलमध्ये रवानगी

By  
on  

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमन राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील सिनेमांची निर्मिती करून एप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. सात आठ तासांच्या चौकशीनंतर राज यांना अटक केली आहे.  

 

 

राज यांच्यासोबत रयान थर्प याला अटक केली आहे. आज त्याला कोर्टासमोर सादर केलं. राजला 23 जुलैपर्यंत पोलिस रिमांडमध्ये पाठवलं जाणार आहे. पीपिंगमूनला एक्सक्लूसिव्हली समजलं आहे की, या प्रकरणात शिल्पा शेट्टीचीही चौकशी होऊ शकते. शिल्पा पतीच्या सगळ्या बिजनेसमध्ये पार्टनर आहे. त्यामुळे तिचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. यापुर्वीही ईडीने मनी लॉड्रींग प्रकरणी राज कुंद्राची चौकशी केली होती.

 

Recommended

Loading...
Share