By  
on  

लग्नात विधींदरम्यान रितेशला तब्बल आठ वेळा जेनेलियाला वाकून नमस्कार करावा लागला होता..

बॉलीवूडचे एक गोड आणि सर्वांचे लाडके सेलिब्रिची कपल रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख  हे  सुपर डान्सर सत्र 4 च्या आगामी वीकेंडच्या ‘शादी स्पेशल’ भागात  कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत. सर्व स्पर्धकांनी काही सुपरहिट गाण्यांवर परफॉर्म केले. त्यापैकी स्पर्धक अनीश तट्टीकोटा आणि त्याचा सुपर गुरु आकाश शेट्टी यांनी ‘माही वे’ गाण्यावर जबरदस्त परफॉर्म करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.


 

जेनेलिया देशमुख म्हणाली, “क्या बात है! तुमचा परफॉर्मन्स पाहून मला माझ्या विवाहसोहळ्याची आठवण झाली!” पुढे ती म्हणाली, “आपण आता विवाह सोहळ्याला आधुनिकतेचा रंग देऊन एका पार्टीचेच स्वरूप त्याला दिलेले असले, तरी मला पारंपरिक विवाह सोहळा आवडतो आणि माझ्या सुदैवाने ते सर्व विधी मी अनुभवले. माझ्यासाठी प्रत्येक विधी आनंददायक होता. विदाईच्या वेळी तर मी फारच भावुक झाले होते. पण, एकंदरित आम्हा सर्वांना या पारंपरिक सोहळ्यात खूप मजा आली होती.”
 

अनीश आणि आकाशच्या परफॉर्मन्सचे कौतुक करताना जेनेलिया असे देखील म्हणाली की, त्या विवाह सोहळ्यादरम्यान विधींचा भाग म्हणून रितेशने तब्बल आठ वेळा जेनेलियाला वाकून नमस्कार केला होता.
त्या दोघांचा परफॉर्मन्स पाहून रितेश देशमुख तर काही वेळ निःशब्द होऊन गेला होता. त्याने आकाशच्या कोरिओग्राफीचे कौतुक केले. रितेश देशमुख म्हणाला, “अप्रतिम! मला इथे बसून हा उत्कृष्ट परफॉर्मन्स प्रत्यक्ष बघता आला हे मी माझे भाग्यच मानतो. तुम्ही दोघांनी मिळून एक मस्त माहोल उभा केलात. हे केवळ गाणे किंवा कोरिओग्राफी इतकेच नाहीये. या डान्सने मला अशी अनुभूती दिली की जणू एका विवाह सोहळ्यात माझ्या एखाद्या आप्तेष्टाने आग्रहाने माझे स्वागत केले आहे.”

या भागात पुढे, रितेश आणि जेनेलिया एक “हू ईज मोअर लाइकली टू” नावाचा खेळ खेळले. यामध्ये होस्ट ऋत्विक धनजानीने त्या दोघांना त्यांच्या संसाराबद्दलचे प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांच्या उत्तरादाखल त्या दोघांना एक प्लॅकार्ड एकमेकांना दिसेल अशा प्रकारे धरायचे होते आणि हे सांगायचे होते की, त्या विशिष्ट परिस्थितीत असण्याची कोणाची शक्यता जास्त आहे. या गेमनंतर हे तर स्पष्ट झाले की, जेनेलिया थोडी वैतागलेली असते पण त्याच वेळी ती खूप रोमॅंटिक सुद्धा आहे. दुसरीकडे, रितेश हा अत्यंत विसराळू आहे आणि झोपेत तो फारच घोरतो. रितेश म्हणाला, “मी आजवर स्वतःला घोरताना कधीच ऐकलेले नाही, पण जेनेलिया जर असे म्हणता असेल, तर मी ते मान्य करतो.”

 


 
बघा शादी स्पेशल भाग सुपर डान्सर सत्र 4 मध्ये या शनिवारी आणि रविवारी रात्री 8.00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive