By  
on  

अक्षय कुमारने ब्लॅक तिकीट घेऊन पाहिला होता अमिताभ बच्चन यांचा हा सिनेमा

अक्षय कुमारचा मोस्ट अवेटेड सिनेमा ‘बेल बॉटम’ 19 तारखेला रिलीजसाठी सज्ज झाला आहे. काल अक्षयने दिल्लीमध्ये ट्रेलर लाँच केला. या दरम्यान अक्षयने एक खुलासा केला आहे. अक्षयने लहानपणी ब्लॅक तिकीट काढून अमिताभ यांचा सिनेमा पाहिला होता. अक्षयने अमर अकबर अ‍ॅंथनी हा सिनेमा ब्लॅक तिकीट घेऊन पाहिला होता.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

 

अक्षय म्हणतो, ‘दिल्लीतील थिएटर्ससोबत माझ्या अनेक आठवणी जोडल्या आहेत. माझा जन्म चांदनी चौक इथे झाला. तिथे डिलाईट नावाचं थिएटर आहे. तिथे मी अनेक सिनेमे पाहिले आहेत. मला अजूनही आठवत की मी अमर अकबर अ‍ॅंथनी या सिनेमाचं ब्लॅकने तिकीट खरेदी केलं होतं. त्यादिवशी खुप पाऊस होता. पण मला काहीही करुन हा सिनेमा पाहायचा होता. अमर अकबर अ‍ॅंथनी हा सिनेमा काही आवडत्या सिनेमांपैकी एक आहे. 1980 काळात घडलेल्या एका ख-या  कथानकावर आधारित थ्रीलर पठडीतला बेलबॉटम हा सिनेमा करोना पार्श्वभूमीवर आपलं शूटींग नियोजितरित्या पूर्ण करणारा पहिला सिनेमा ठरला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive