By  
on  

‘सॉरी...... मी नाक कापलं’ म्हणत सारा अली खानने शेअर केला हा व्हिडियो

आपल्या बबलीनेसने प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री म्हणजे सारा अली खान. साराचं सोशल मिडिया फॅन फॉलोविंग खुप आहे. आताही तिने एक खास व्हिडियो शेअर केला आहे. साराने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ खाली तिने “सॉरी अम्मा अब्बा लगी, नाक काट दी मैंने” असं कॅप्शन दिले आहे.  तिच्या या हटके कॅप्शन नी चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

 

 

कारण या व्हिडियोमध्ये साराच्या नाकाला जखम झालेली दिसते आहे. सारा आणि धनुष आगामी ‘अतरंगी रे’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. यात तिच्यासोबत अक्षय कुमारही झळकणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive