By  
on  

अभिनेती आदिती गोवित्रिकरची बहीण मॉडेल आरजू गोवित्रिकरने केली पतीविरोधात तक्रार

‘बागबान’ सिनेमात दिसलेली अभिनेत्री आरजू गोवित्रिकरने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. 2019मध्येही तिने पतीवर मारहाणीची तक्रार दाखल केले होती. ई-टाईम्सशी बोलताना तिने भावनांना वाट करुन दिली. मी यापुर्वी खुप सहन केलं आहे. आता आणखी नाही, या नात्यासाठी मी माझा आत्मसन्मान पणाला लावला, हे नातं वाचवण्याचा मी खूप प्रयत्न केला परंतु, त्याचा काही उपयोग झाला नाही. 2 वर्षांनंतर मी याबाबत बोलते आहे. 

 

केसांना आणि मानेला पकडून मला ओढलं आणि मला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. माझ्या पोटाात जोरात लाथ मारली. अंगावरचे व्रण लपवण्यासाठी मी बाहेर जाणं टाळलं. घरातील नोकरानी सारखी वागणूक दिली. लग्नानंतर दोन वर्षातच हे सगळं सुरु झालं. यापुर्वीही त्याने अनेकदा मला मारहाण केली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive