By  
on  

निर्माते विभू अगरवाल यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल

 'उल्लू डिजिटल प्रायवेट लिमिटेड’ चे निर्माते आणि सीईओ विभू अगरवाल विरोधात केस दाखल झाली आहे. एका महिलेने त्यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचा आरोप दाखल केला आहे. आईपीसी कलम 354 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे.  याशिवाय कंपनीची कंट्री हेड अंजली रैना विरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.

 

 

विभू यांची कंपनी अडल्ट कंटेट बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. एएनआयने ट्वीट करत अगरवाल यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती शेअर केली आहे. 2018मध्ये या कंपनीने बात बन गयी या सिनेमाची निर्मिती केली होती. तर याच वर्षी उल्लू अ‍ॅप लाँच केलं होतं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive