By  
on  

Bhuj: The Pride Of India Review : शौर्य, अभिमान आणि देशभक्तीची नवी गाथा पाहा या वॉर ड्रामामध्ये

सिनेमा: भुज: द प्राइड ऑफ इंडिया 

कलाकार: अजय देवगण,, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, महेश शेट्टी, नोरा फतेही, शरद केळकर, एमी विर्क आणि प्रणिता सुभाष

ओटीटी: डिस्ने + हॉटस्टार

रेटिंग: 3.5 मून्स

 

देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. देशभक्तीपर सिनेमाच्या रिलीजसाठी यापेक्षा चांगली वेळ कुठली असूच शकत नाही. नुकताच अभिषेक दुधैय्या दिग्दर्शित भुज: द प्राइड ऑफ इंडिया हा सिनेमा रिलीज झालेला आहे. 1971 मधील भारत पाकिस्तान युद्धावरील सत्य घटनेवर हा सिनेमा आधारलेला आहे. स्क्वाड्रन लीडर विजय कर्णिक (अजय देवगण) यांच्या शौर्यावर हा सिनेमा बेतला आहे. 

 

हा सिनेमा आपल्याला 1971 च्या युद्धकाळात घेऊन जातो. गुजरातमधील भुज येथे असलेली हवाई पट्टी पाकिस्तानी हल्ल्यात उध्वस्त होते. यानंतर कोणताच आशेचा किरण दिसत नसताना विजय कर्णिक केवळ 300 महिलांच्या मदतीसह रातोरात पुन्हा धावपट्टी बांधून घेतात. सुंदराबेन जेठा मधारप-या (सोनाक्षी सिन्हा) या कामी विजय कर्णिक यांना मदत करते.याशिवाय स्काऊट रणछोडदास पागी (संजय दत्त), हीना रहमान (नोरा फातेही), जनरल विनोद कर्णिक (महेश शेट्टी), राम करण नायर (शरद केळकर) आणि फ्लाईट लेफ्टनंट विक्रम सिंह बाज (एमी विर्क) या लढयात आपलं महत्त्वपुर्ण योगदान देताना दिसतात. 

 

हा एक वॉर सिनेमा असल्याने युद्धपटाचे सगळे रंग दिसतात. पण व्हिएफएक्समध्ये हा सिनेमा कुठेतरी कमी पडताना दिसतो. पण या सिनेमाच्या इतर सर्व कमकुवत बाजू उत्तम अभिनयाने तरल्या जातात. अजय सहित सर्वच कलाकारांनी आपल्या वाट्याला आलेली भूमिका उत्तम बजावली आहे. सोनाक्षीचा अभिनय या सिनेमात सरप्राईज पॅकेज आहे.

 

 

संजय दत्तनेही या सिनेमात आपला रंग भरला आहे. नोरा फातेही या सिनेमात हेराच्या भूमिकेत दिसली आहे. नायरच्या व्यक्तिरेखील शरद सहज आवडून जातो. इतके सगळे प्लस पॉईंट असूनही हा सिनेमा एडिटिंग, व्हीएफएक्स आणि संगीत काहीशी निराशा करताना दिसते. पण वॉर सीनची सिनेमॅटोग्राफी उत्तम साधली आहे. येत्या स्वातंत्र्यदिनाला देशभक्तीच्या भावनेने भारले असाल तर हा सिनेमा तुमच्यासाठी योग्य आहे. 

 

पीपिंगमून मराठी या सिनेमाला देत आहे 3.5 मून्स

 

(शब्दांकन: अमृता पाटील-चौगुले‌)

 

Recommended

PeepingMoon Exclusive