By  
on  

बिग बी आपल्या बॉडीगार्डला वर्षाला देतात इतका पगार

महानायक अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रियतेची तुलना अफाट समुद्रासोबत केली तरी ती वावगी ठरणार नाही. देश-विदेश, सातासमुद्रापार बिग बींचे प्रचंड फॅन्स आहेत. आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यांचेसुध्दा इतके फॅन्स नसतील तितके बिग बींचे चाहते जगभर आहेत. प्रत्येक रविवारी महानायकाची एक झलक पाहण्यासाठी जुहू येथील त्यांच्या बंगल्यावर चाहते जमा होतात. पण आता सध्या करोनामुळे ते थोडं कमी झालं आहे, तरीही लोकप्रियता कायम आहे. 

चाहत्यांचा सतत त्यांच्याभोवती गराडा असतो, म्हणूनच सुरेक्षेसाठी सतत सुरक्षारक्षकांची फौज त्यांच्या भोवती असते. या सुरक्षारक्षकांना कलाकार मंडळी किती पगार देत असतील हासुध्दा एक औत्सुकतेचा विषय आहे. त्यांचा पगार लाखो-करोडोंच्या घरात असतो, हे नक्की. 

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या वैयक्तिक सुरक्षारक्षकांचं नाव जितेंद्र शिंदे हे. तो सतत सावलीसारखा त्यांच्यासोबत असतो. अनेक इव्हेंट्सदरम्यान जितेंद्र हा बिंग बींसोबत पाहायला मिळतो. अमिताभ यांच्यासोबत जितेंद्र परदेश दौरेसुध्दा करतात. अमिताभ जितेंद्र यांस जवळपास 1.5 कोटींचा वार्षिक पगार देतात. 

जितेंद्र यांची स्वत:ची सिक्युरटी एजन्सी आहे, तरी ते बिग बींना सुरक्षा देतात. 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive