By  
on  

Video : ‘तू शायर है..’ वर बॉलिवूड गाजवणा-या माधुरी दीक्षित आणि उर्मिला मातोंडकरचा डान्स

बॉलिवूड गाजवणा-या दोन मराठमोळ्या अभिनेत्री तुम्हाला चांगल्याच माहिती आहेत. त्यापैकी एक म्हणजे आपली धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि दुसरी रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर. नुकताच या दोघींना एकत्र सोबत धम्माल थिरकतानाचा पाहण्याचा दुग्धशर्करा योग घडला. ही चाहत्यांसाठी खुप मोठी पर्वणीच होती. 

माधुरी डान्स दिवाने या डान्स शोचं जज म्हणून काम पाहत आहे. ती सोशल मिडीयावर बरीच सक्रीय असते. 
 

माधुरी दीक्षितने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन उर्मिलासोबत ‘साजन’च्या तु शायर है...या गाण्यावर थिरकतानाचा जबरदस्त व्हिडीओ शेअर केला आहे. डान्स दिवाने- ३ च्या सेटर उर्मिला पाहुणी परिक्षक म्हणून हजर होती. तेव्हा दोघींनी खुप धम्माल केली. 
 

 

 

 

ह्यावेळी माधुरी लाल रंगाच्या सुंदर आऊटफिटमध्ये दिसली तर उर्मिला निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खुपच ग्लॅमरस पाहायला मिळाली. दोघींनी या व्हिडीओत हातांनी सुरेख डान्स स्टेप केल्या आहेत. पाहता पाहता या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव होतोय. काही मिनीटांतच या व्हिडीओला 93 हजारांहून अधिक लाईक्स तर प्रचंड कॉमेंट्सही आले. 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive