By  
on  

सिद्धार्थ शुक्लाच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचली त्याची आई आणि बहीण, ह्रदय पिळवटून टाकणारी दृश्ये

आज शुक्रवारी ओशीवर स्मशानभूमीत लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्लावर अंत्यसंस्कार करण्यात येणारेय. यासाठी त्याचे कुटुंबिय आणि मित्रपरिवार तेथे पोहोचतोय. नुकतच सिद्धार्थची आई रिटा शुक्ला आणि बहीण ओशीवरा स्मशानभूमीत पोहोचलीय. ही ह्रदय पिळवटून टाकणारी दृश्ये स्मशानभूमीजवळ पाहायला मिळालीत. जिथे पाणावलेल्या डोळ्यांनी सगळे जण आपल्या लाडक्या अभिनेत्याला आणि खास व्यक्तिचं अंतिम दर्शन घेण्यासाठी पोहोचलेत.

यावेळी सिद्धार्थच्या आईने ओढणीने चेहरा झाकला होता. स्वत:ला सावरत ती स्मशानभूमीकडे पोहोचली होती. आपल्या मुलाचं अंत्यसंस्कार हे एका आईसाठी त्रासदायक आणि अस्वस्थ करणार असतं. या दृश्यातून हेच पाहायला मिळतय. 

सिद्धार्थ शुक्लाच्या अंत्यसंस्कार आणि अंतीम दर्शनासाठी स्मशानभूमीबाहेर आणि आत मोठी गर्दी जमा झालेली पाहायला मिळतेय.

 

सिद्धार्थला श्रद्धांजली वाहण्यासाठी त्याची जवळची मित्रमंडळी आणि मनोरंजन विश्वातील कलाकारही पोहोचले आहेत.

 

Recommended

PeepingMoon Exclusive