By  
on  

‘मुळशी पॅटर्न’ चा हिंदी रिमेक असलेला सलमान स्टारर ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ चं दमदार पोस्टर समोर

सलमान खान प्रॉडक्शनचा आणखी एक सिनेमा 'अंतिम: द फायनल ट्रुथ' चं पोस्टर आज समोर आलं आहे. हा सिनेमा प्रवीण तरडे दिग्सर्शित मुळशी पॅटर्न सिनेमाचा रिमेक आहे. या पोस्टरमध्ये आयुष शर्मा आणि सलमान आमने-सामने दिसत आहेत. दोघांच्या डोळ्यातील राग या पोस्टरमधून दिसून येतो.

 

 

मुळशी पॅटर्नप्रमाणेच हा सिनेमाचं कथानक पोलिस अधिकारी आणि गॅंगस्टरच्या भोवती फिरते. या सिनेमातील हा संघर्ष वेगळ्याच पद्धतीने दर्शवला जाणार आहे. या सिनेमाच्या निमित्तने सलमान आणि आयुष शर्मा पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. महेश मांजरेकर या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive