By  
on  

मराठमोळया अंकिता लोखंडेच्या घरच्या गौरींची सजावट पाहिली का?

तीन दिवसांपुर्वीच गणपती बाप्पांचं घरोघरी वाजत-गाजत आगमन झालं. काल घरोघरी माहेरवाशिणी गौराईचंही आगमन झालं आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या घरीही गौरीचं आगमन झालं आहे. यावेळी तिने फोटो पोस्ट करत गौरीची आरास चाहत्यांशी शेअर केली आहे. यासोबतच तिने ‘Blessed’ असं कॅप्शनही दिलं आहे. 

 

 

पिंक कलरचा चुडिदार आणि दुपट्टा असा अंकितचा लूक आहे. यासोबतच तिने नथ कॅरी केली आहे. अंकिता सध्या पवित्र रिश्ता 2.0 मधून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. तिच्यासोबत या मालिकेत शाहीर शेख दिसतो आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive