By  
on  

कपिल शर्माच्या शोवर गंडातर, FIR झाली दाखल

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो म्हणजे कपिल शर्मा शो. या शोमधील कलाकारांच्या अदाकारीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण सध्या कपिलच्या लोकप्रिय शो विरोधात तक्रार दाखल झाली आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये दाखवण्यात आलेल्या एका दृष्यावरून शिवपुरीच्या जिल्हा न्यायालयात एफआयआर दाखल केली आहे. या कलाकारांनी न्यायालयाचा अपमान केल्याप्रकरणी ही तक्रार दाखल झाली आहे. 

 

या एफआयआरमध्ये तक्रारदाराने म्हटलं आहे की, शोमध्ये बेकायदा कोर्ट तयार करण्यात आलं आणि त्याठिकाणी काही कलाकारांनी दारू पिऊन अभिनय केला. हा कायदा आणि न्यायालयाचा अपमान आहे.’ या शोवर आणि कलाकारांवर कलम ३५६/३ अंतर्गत तक्रार दाखल झाली आहे. या एफआयआरवर 1 ऑक्टोबरला सुनावणी केली जाणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive