By  
on  

जिनिलियाला निर्लज्ज, अश्लील काकू म्हणणा-या युजरचा रितेशने घेतला समाचार

जेनिलिया रितेश सोशल मिडियावर चाहत्यांची लाडकी जोडी आहे. रितेश अनेकदा सोशल मिडियावर जेनिलियासोबतचे फोटो, व्हिडियो शेअर करत असतो. पण ही जोडी आता एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहे. 
रितेश आणि जिनिलियाने अरबाज खानच्या ‘पिंच’ या टॉक शोमध्ये हजेरी लावली होती.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

 

यावेळी अरबाजने सोशल मीडियावर जिनिलियाला ‘चीप, निर्लज्ज आणि असभ्य काकू’ उल्लेख केलेल्या एका युजरची कमेंट वाचली. यावर रितेशच्या उत्तराने सगळ्यांना चकित केलं. रितेशने अरबाजला या युजरचं नाव विचारलं. यावर ‘युनिवर्स योगा’ असं युजरचं नाव असल्याचं अरबाज म्हणाला.

युजरचं नाव ऐकून रितेश म्हणाला, “या युजरला खरोखरच योगा करण्याची गरज आहे. त्याने कपालभाति, शवासन केलं पाहिजे’. यासाठी नेटिझन्स रितेश- जेनिलियाचं कौतुक करत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive